मुंबईतील काही महत्वाच्या रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. त्यासाठी काही रेल्वे स्थानके विमानतळांसारखी विकसित करण्यात येणार आहे, मुंबईतील सीएसएमटी, ठाणे, मुंबई सेंट्रल, बोरिवली, दादर, ठाकुर्ली या रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.
देशातील ६८ स्थानकांची निवड!
केंद्राने अशा प्रकारे देशभरातील ६८ रेल्वे स्थानकांची निवड केली आहे. त्यामध्ये मुंबईला प्राधान्य देण्यात आले आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत भोपाळ, गांधीनगर आणि उत्तर प्रदेशातील काही रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात आला आहे. आता मुंबईतील सीएसएमटी, ठाणे, मुंबई सेंट्रल, बोरिवली, दादर, ठाकुर्ली या रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे, असे दानवे म्हणाले.
आज मुंबईच्या मध्य रेल्वेच्या मुख्यालयात जीएम अनिल कुमारजी लाहोटी यांनी स्वागत केले.
आज मध्य रेलवे, मुंबई के मुख्यालय में जीएम अनिलकुमार लाहोटी जी ने स्वागत किया।@RailMinIndia @Central_Railway #Mumbai #Maharashtra pic.twitter.com/0a9wU7z5yy
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) September 7, 2021
असा होणार बदल!
मुंबईतील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करताना त्यामध्ये होणारी गर्दी कशी विभागली जाईल, प्रवेशद्वारांवर होणारी गर्दी कमी होईल, सुशोभीकरण, उपहारगृहे इत्यादी गोष्टींचा विचार करण्यात येणार आहे. यासाठी आपण दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहोत. त्यानिमित्ताने सीएसएमटी ते ठाणे लोकल प्रवास केला आहे. प्रवास दरम्यान प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यानुसार निर्णय घेणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community