नाशिक जिल्ह्यातील द्वारकेतील काठेगल्ली परिसरात २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या अनधिकृत दर्ग्यावर (Dargah) शनिवार, २२ फेब्रुवारीला प्रशासनाने कारवाई केली. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये, म्हणून प्रशासनाने हिंदू संघटनांचे कार्यकर्ते, संत, महंत यांना नजरकैदेत ठेवले. यात महंत सुधीरदास महाराज आणि महंत अनिकेशास्त्री महाराज यांचा समावेश आहे. दर्ग्यावरील कारवाईनंतर त्याला विरोध करणारा समाज घटकही आक्रमक झाला होता, त्यामुळे परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी परिसरात संचारबंदी लागू केली.
या दर्गाचे (Dargah) बांधकाम तोडून त्या जागी हनुमंताचे मंदिर बांधण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली. हिंदू कार्यकर्त्यांनी शनिवारी २२ फेब्रुवारीला आंदोलनाचे नियोजन केले होते. हे कसमजताच घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यासोबतच परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला. यावेळी हिंदुत्वनिष्ठ, साधू, संत, महंत यांच्या अटकेमुळे हिंदू समुदाय आणखी संतप्त झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी शुक्रवारी रात्री, २१ फेब्रुवारी २०२५ पासून घटनास्थळी जाणारे अनेक रस्ते बंद केले. हालचाली रोखण्यासाठी विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले. त्याच वेळी, पोलिस उपायुक्तांनी मुंबई नाका आणि भद्रकारी पोलिस हद्दीतील रस्ते देखील बंद केले.
(हेही वाचा नाशिकमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधामुळे प्रशासनाने २५ वर्षांपूर्वीचा अनधिकृत Dargah केला जमीनदोस्त)
भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी घटनास्थळी भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना त्यापूर्वीच रोखले. आमदार देवयानी यांनी आरोप केला आहे की, “सध्या नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्याचे (Dargah) अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण दर्ग्यावर (Dargah) अतिक्रमण आहे आणि महानगरपालिकेने ते हटवावे. त्यांच्या (महानगरपालिकेच्या) निष्काळजीपणामुळे हे सर्व (निषेध) वाढत आहेत.”
Join Our WhatsApp Community