सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे – गिरिष महाजन

113

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे पर्यावरण आणि आरोग्यासाठी पुणे ऑन पेडल्स् या भव्य सायकल रॅलीचे आयोजन प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांच्यावतीने छ. शिवाजी महाराज पुतळा कोथरूड या ठिकाणी करण्यात आले होते. या भव्य रॅलीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या रॅलीला प्रमुख उपस्थिती तंत्र आणि शिक्षणमंत्री चंद्रकातदादा पाटील तसेच अनेक क्रीडापटूंनी सहभाग घेतला होता. या रॅलीचा समारोप झाशीची राणी पुतळा बालगंधर्व चौक या ठिकाणी करण्यात आला.

गिरीष महाजन म्हणाले की सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले की मी शालेय जीवनापासून सायकल चालवत आहे. उत्तम आरोग्यासाठी मी रोज १ तास व्यायाम करतो तसेच सायकलही चालवतो.

….म्हणून सायकल रॅलीचे आयोजन 

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की सायकलमुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. पुणे शहराची झपाट्याने होणारी वाढ, वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर, वाढती लोकसंख्या, वाहतूक व्यवस्था आदींवर भार पडत असल्याने नियमीत सायकल चालवून उत्तम आरोग्य ठेवून वाढते प्रदूषण आपण कमी करू शकतो. या प्रसंगी बोलताना प्रा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, की पुणे हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात मोठ्या प्रमाणात सायकल प्रेमी आहेत. पुणे शहर पर्यावरणपूरक व्हावे, शहराचा शाश्वत विकास व्हावा, महिला सुरक्षित रहाव्यात, या प्रेरणेने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

( हेही वाचा: मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा – राज ठाकरे )

‘या’ मान्यवरांची प्रमुख उपस्थिती 

या प्रसंगी क्रीडापटू मारुती गोळे, अतुल गोडबोले, प्रीती मस्के, चेतन येवलेकर, समृद्धी कुलकर्णी, निलेश मिसाळ, शंकर गाढवे, राहुल नलावडे, सुनिल कुकडे, कल्याणी टोकेकर, बाळकृष्ण नेहरकर, आनंद कंसल आदी सायकलपटू यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत लहान मुले, तरुण आणि वयोवृद्ध पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. सहभाग घेतलेल्या सर्वांना टी शर्ट, मेडल आणि प्रशस्तीपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.