दादर चैत्यभूमीवरील भागोजी किर स्मशानभूमीत मागील पाच महिन्यांपासून गळक्या टाकीमधून दरदिवशी दहा हजार लिटर पाणी वाहून जात होते. याबाबत स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत पत्र पाठवूनही याकडे कोणत्याही प्रकारची दखल जी उत्तर विभागातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह देखभाल व दुरुस्ती विभागाने घेतली नव्हती. परंतु हिंदुस्थान पोस्टने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर याची दखल महापालिका प्रशासनाने घेऊन या टाकीला जोडले गेलेले जलवाहिनीची जोडणी तोडण्यात आली आहे. या गळक्या व फुटक्या टाकीला जोडणाऱ्या टाकीची जोडणी तोडण्यात आल्याने या टाकीत भरले जाणारे आणि त्यातून भरुन वाहून जाणारे हजारो लिटर पाणी आता वाचवण्यात आले आहे. मात्र,या टाकीची जोडणी तोडण्यात आल्याने याद्वारे मिळणाऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या आता या स्मशानभूमीमध्ये अंतिम विधी आणि अंत्यसंस्काराला येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
दादरमधील भागोजी किर स्मशानभूमीत अंत्यविधी आणि धार्मिक विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना आंघोळीसह हातपाय धुण्यासाठी तसेच वापरासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून पाच हजार लिटर क्षमतेच्या चार टाक्या बसण्यात आल्या आहेत. परंतु यातील एक टाकी फुटलेली असून यात भरणारे पाणीही वाहून जाते आणि वाहूनही जात होते. याशिवाय अन्य तीन टाक्यांमधून वाहून जाणारे पाणी बंद करण्याची प्रणाली नसल्याने रात्री दहा वाजेपर्यंत यातील पाणी वाहून जायचे. या फुटलेल्या टाकीसह अन्य वाहून जाणाऱ्या टाक्यांमधून सुमारे दहा हजार लिटर पाणी वाहून जात असतानाही महापालिकेच्या जी उत्तर विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह देखभाल व दुरुस्ती विभागाच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत होते. याबाबत या स्मशानभूमीच्या नोंदणी अधिकाऱ्यांनी १८ जुलै २०२२ रेाजी जी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून याची कल्पना दिली. ही टाकी फुटल्यानंतर महापालिकेच्या प्लंबरच्या मदतीने एम सील लावून तात्पुरती स्वरुपात डागडुजी केली आहे. परंतु त्यानंतर जुलैमध्ये ही टाकी अधिक फुटली गेली आणि त्यातील पाणी वाहून जात आहे. याबाबत महापालिका जी उत्तर विभागाला स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही आजपावेतो फुटलेली टाकी बदलण्यात आलेली नाही. परिणामी यासर्व टाक्या एकमेकांना जोडल्या गेलेल्या असल्याने या फुटक्या टाकीमुळे इतर तीन टाक्यांमधील पाणीही त्यामुळे वाहून जात आहे.
याबाबत १६ नोव्हेंबर २०२२ रोजी दादरमधील भागोजी किर स्मशानभूमीत दररोज दहा हजारांहून अधिक लिटर पाणी जाते वाया या मथळ्यासह वृत्त प्रकाशित केली होती. या वृत्तानंतर जी उत्तर विभागाने गळक्या आणि तुटक्या टाक्याचे सामायिक जोडणी रद्द करून त्यातील जलवाहिनीची जोडणी कापून टाकण्यात आली आहे. त्यामुळे सर्व टाक्या एकमेकांना जोडल्या गेल्या असल्याने गळक्या व तुटलेल्या टाकीमधून पाणी भरल्यानंतर ते वाहून जायचेच शिवाय पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर गळक्या टाकीतील पाणीही रिकामी व्हायचे आणि अन्य टाक्यांचेही पाणी त्यामुळे खाली व्हायचे. त्यामुळे या टाक्यांची जोडणी कापण्यात आल्याने यातील पाणी पुरवठा बंद करण्यात आला असल्याची माहिती स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. मात्र, ही टाकी बंद करण्यात आल्याने याद्वारे मिळणारे ५ हजार लिटर पाणी कमी झाले असून त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याने याठिकाणी नव्याने पाण्याची टाकी बसवण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक मनिष चव्हाण यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community