दहीहंडी या धार्मिक उत्सवाला आता खेळाचा दर्जा मिळणार आहे. राज्य सरकारने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला असून गुरूवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. त्यानुसार पुढील वर्षापासून आता ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर ‘प्रो दहीहंडी’ हा खेळ सुरु होणार आहे.
गोविंदाना मिळणार ५ टक्के आरक्षणाचा लाभ
विशेष म्हणजे राज्य सरकारच्या खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ नोकऱ्यांमध्ये गोविंदांना देखील मिळणार आहे. सभागृहात बोलताना मुख्यमंत्री शिंदे असेही म्हणाले की, दहीहंडी उत्सवातील गोविंदाना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दहीहंडी उत्सवात जर कोणत्या गोविंदा पथकाचा मृत्यू झाल्यास १० लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्या गोविंदाना ७ हजार ५० लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पायाला दुखापत झालेल्या किंवा जखमी झालेल्यांना ५ लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे.
(हेही वाचा – मंत्री तानाजी सावंतांनी पुन्हा केले ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य)
किरकोळ अपघात झाल्यास मोफत उपचार
यासह दहीहंडीच्या वेळी किरकोळ अपघात झाल्यास गोविंदावर महापालिकेच्या तसेच शासकीय रूग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. याबाबत शिवसेनेचे नेते सुनील प्रभूंनी सभागृहात ही मागणी केली होती. प्रभू यांच्या निवेदनावर उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शुक्रवारी दहीहंडीवेळी ज्या गोविंदांचा अपघात झाल्यास मोफत उपचार करण्यात येणार आहे. याबाबत सूचना दिल्या जातील, तसेच सराव शिबिराबाबत नोंद ठेऊन याबाबत पुढे कार्यवाही होईल.
Join Our WhatsApp Community