कोकणातील Shivsena UBT चे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतल्यानंतर उबाठा गटाने आता कोकणात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सुरुवात केली आहे. यावर शिंदे गटाच्या नेत्याने उबाठा गटाकडून डॅमेज कंट्रोल करणे अपेक्षित आहे, पण ज्या लोकांना नवीन जबाबदारी देणार ते तरी कायम राहतील, याची दक्षता घ्यावी, असे सूचक विधान मंत्री उदय सामंत यांनी दिली.
राजन साळवी यांनी पक्ष सोडल्यानंतर मातोश्रीवर ठाकरेंनी (Shivsena UBT) आपल्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले तर डॅमेज कंट्रोल करावाच लागतो. त्या पक्षात नवीन पदाधिकारी नेमणूक काही गैर नाही. नेमलेले पदाधिकारी पुन्हा तिथेच राहिले पाहिजेत याची दक्षता मात्र घ्या, असा टोला सामंत यांनी ठाकरेंना लगावला. संजय राऊत यांचा राजापूर दौरा होणार असेल तर ती पक्षाची रणनीती आहे. असलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळणे ही त्यांची जबाबदारी आहे. निवडणुका झाल्याबरोबर आत्मचिंतनाला सुरुवात झाली असती तर बरे झाले असते. कालच्यासारखे प्रसंग उभे राहिले नसते, असा टोलाही त्यांनी लगावला. शिंदे गटात तिसऱ्या टप्प्यात काही पक्षप्रवेश होणार आहेत. ते नाव न सांगता होणार आहेत. आदल्या दिवशी तुम्हाला नाव सांगितले जाईल असे सामंत म्हणाले. (Shivsena UBT)
Join Our WhatsApp Community