मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, राजभवनात मोर दिसतात तसे विषारी सापही!

162

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद अनेकदा पेटलेला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. त्यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या भेटी तशा वारंवार होत नाहीत. क्वचित कधीतरी हे दोघे भेटतात तेव्हा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागते. राजभवनातील नवीन दरबार हॉलच्या उदघाटन प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनाच्या परिसरातील वातावरणाचे वर्णन करताना या भागातील वातावरण राजकीयदृष्ट्या गरम असते, तरी हवा थंड असते, इथे परिसरात जसे मोर दिसतात, तसेच काही विषारी सापही आढळतात. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य राजकीय होते का, अशी चर्चा सुरु झाली.

111 वर्षांपूर्वीचा इतिहास या दरबार हॉलला लाभला आहे. आधी या हॉलमध्ये 225 एवढी आसनव्यवस्था होती. आता नव्याने उभारण्यात आलेल्या या हॉलमध्ये 750 माणसं बसू शकतील एवढी असणं व्यवस्था करण्यात आली आहे. आधुनिक गोष्टींनी सुसज्ज अशा या नव्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले.

विरोधकांना काढला चिमटा 

राजभवनाच्या नवीन दरबार हॉलचे उद्घाटन शुक्रवारी, ११ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनाचे वर्णन करताना म्हणाले, हे राजभवन आमच्यासाठी काही नवं नाही, आम्ही विरोधी पक्षात होतो, तेव्हा इथे कायम यायचो, पण रोज काही येत नव्हतो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला चिमटा काढला. या राजभवनातील नवीन दरबार हॉलच्या या निर्मितीने आपल्याला अत्यंत आनंद होत आहे. या ऐतिहासिक वास्तूला जुनी परंपरा आहे. दरबार हॉल आणि राजभवन आमच्यासाठी नवीन नाही. विरोधी पक्षात असताना आम्ही सुद्धा इथे आमच्या व्यथा गाऱ्हाणी सांगायला यायचो, पण सारखे येत नव्हतो. तसेच हे देशातील सर्वोत्तम राजभवन असेल. या राजभवनाला अथांग समृद्र किनारा लाभला आहे. नैसर्गिकदृष्ट्या तसेच ऐतिहासिकदृष्ट्या या राजभवनाचे विशेष महत्व आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या राजभवनात जसे  मोर दिसतात तसे विषारी सापही आढळतात, या आवारात मोरही आहेत. विषारी नागही आहेत. सर्प मित्रांनी नागांचे पकडलेले फोटो आपण पाहतच असतो, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. राजकारणाची हवा कशीही असली तरी इकडे मात्र छान गार वारा वाहत असतो असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या वास्तू सारखी वास्तू कुठेही सापडणार नाही ही एक दुर्मिळ वास्तू असल्याचे म्हटले.

(हेही वाचा आता BEST बसमध्येही करा रिझर्वेशन! कसं ते वाचा…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.