राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात असताना, राज्यात सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात दसरा मेळाव्यावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात. बाळासाहेबांच्या प्रथा परंपरा कायम ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे. दसरा मेळावा हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे आम्ही दसरा मेळावा घेणारच आहोत, असे दीपक केसरकर म्हणाले.
( हेही वाचा: दसरा मेळाव्यात क्रांतीकारी निर्णय का घेतला याचा भांडाफोड करा; कुडाळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र )
बाळासाहेबांच्या विचारांचे कोण हे समजेल
उद्धव ठाकरेंना टोला लगावत दीपक केसरकर पुढे म्हणाले की, जर ठाकरे गटाने दसरा मेळावा घेतला तर त्यांनी स्टेजवर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीला बोलवावं म्हणजे लोकांना कळेल की बाळासाहेबांच्या विचारापासून कोण दूर गेलं आहे. तसेच, राज्यातील सत्तासंघर्षावर बोलताना केसरकर म्हणाले की जे काही होईल ते कायद्याने होईल.
Join Our WhatsApp Community