हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली होती. या पोकळीमुळे प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेबांच्या हिंदूत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी पुढे सरसावला. स्वतःला बाळासाहेब समजू लागला. परंतु या शिवसैनिकांवर अन्याय होऊ लागला. शिवसैनिकांचे दुःख दुर्लक्षित होत असताना एकनाथ शिंदे यांनी या तमाम शिवसैनिकांमध्ये स्वाभिमानाचे स्फुरण भरले. शिवसैनिंकावरील अन्याय दूर केला, असे प्रतिपादन शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी केले. वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शिंदे गटातील दसरा मेळाव्यात बोलताना बाळासाहेबांच्या निधनानंतर स्वाभिमानी शिवसैनिकांवर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेनेत फूट पाडल्यानंतर शिंदे गटाकडून आयोजित दसरा मेळाव्यात मूळ शिवसेना कोणाची या प्रश्नाचे उत्तर देताना मूळ शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांनी घडलेल्या प्रत्येक शिवसैनिकांची असल्याचे सांगितले. बाळासाहेबांच्या विचारांत हिंदूत्व आणि आपल्या प्रत्येक शिवसैनिकांच्या आपुलकीचा प्राधान्यक्रम होता. शिवसेना संपर्क अभिनायानादरम्यान आम्ही गावागावांना भेटी दिल्या. प्रत्येक शिवसैनिकांच्या तोंडी अन्यायाची तक्रार होती. मात्र तक्रारींचे निराकरण कोणीही करत नव्हते. या अन्यायग्रस्त शिवसैनिकांचे लोकनाथ आणि जगन्नाथ मुख्यमंत्री एकनाश शिंदे झाले. आताची लढाई ही बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकांची आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. आम्हांला गद्दार नाही तर खुद्दार म्हणा, असा टोलाही खासदार धैर्यशील माने यांनी लगावला. बाळासाहेब के वफादार है हम, भलेही हम उनके खून के नहीं, लेकिन विचारोंके सच्चे वफादार हे हम, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री कसा असावा हे महाराष्ट्राने वसंतदादा पाटील यांच्यानंतर आता पाहिले आहे. एकनाथ शिंदे हे जनतेचे मुख्यमंत्री आहेत. रात्री दोन वाजताही मुख्यमंत्री लोकांना भेटतात. शिवसैनिकांचे फोन उचलतात.
( हेही वाचा: उध्दव ठाकरेंना मोठा झटका: बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे शिंदेसोबत )
मुख्यमंत्र्यांकडे आशेने बघत आहे. रात्री दोन वाजता एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांचे फोन उचलतात, भेटीला जातात. लोकांचा मुख्यमंत्री कसा असतो हे वसंतदादा पाटील यांच्यानंतर आता महाराष्ट्र पाहत आहे. शिवसैनिकांना स्वाभिमानाने जगण्यासाठी मनगटात बळ देणारे एकनाथाचे हात बळकट करा. ३७० कलम, राममंदिर हे बाळासाहेबांनी मित्रपक्षासोबत स्वप्न पाहिले होते. त्यांच्याशी सोबत करुन कोणतीही गद्दारी केली नाही,असेही माने यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community