शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली समर्थक आमदारांचा शिंदे गट तयार झाला. त्यानंतर या गटाकडून शिवसेनेवर दावा करण्यात आला. अशातच दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळवण्याकरता शिंदे आणि ठाकरे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.
दरम्यान, शिंदे गटाला बीकेसी मैदानावर सभा घेण्याची परवानगी एमएमआरडीएने दिल्याचे समोर आले आहे. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात सभेच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून कऱण्यात आलेला अर्ज एमएमआरडीएने फेटाळला आहे. यानंतर शिंदेंचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता उद्धव ठाकरेंचा मेळावा नेमका कुठे होणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचा – Chandigarh University: अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने 8 जणींनी उचलले टोकाचं पाऊल)
समोर आलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात दसरा घेण्याची परवानगी मिळाली आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाने एमएमआरडीएकडे अर्ज केला होता. हा अर्ज एमएमआरडीएने स्वीकारला आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी ज्या मैदानाची परवानगी मागितली होती मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील दोन मैदाने कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येतात. यापैकी एका मैदानासाठी शिंदे गटाने, तर दुसऱ्या मैदानासाठी शिवसेनेने अर्ज केला होता. शिंदे गटाने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता ते आरक्षित नव्हते त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तर शिवसेनेकडून कऱण्यात अर्ज आणि त्यामध्ये नमूद केलेले मैदान हे एका खासगी कंपनीने आरक्षित केले आहे. त्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळून लावला आहे.
नियमाने शिवाजी पार्क आम्हाला मिळायला हवे
शिवसेनेच्या स्थापनेपासून दादर येथील शिवाजी पार्कवरच शिवसेनेचा दसरा मेळावा घेतला जातो. मात्र शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज केला होता. परंतु, कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी बीकेसी येथील एका मैदानासाठी देखील एमएमआरडीएकडे अर्ज केला होता. यावर एमएमआरडीएने परवानगी दिली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, शिवसेनेच्या वतीने आम्ही अर्ज केला होता. एमएमआरडीएने त्यांना परवानगी दिली आहे. पहिले आले म्हणून त्यांना परवानगी दिली. याच नियमाने शिवाजी पार्कवर आम्हाला परवानगी मिळायला हवी. आम्ही शिवाजी पार्कवरील सभेसाठी आधी परवानगी मागितली आहे. शिवसेनेची ही परंपरा आहे, ही परंपरा कधी थांबली नाही.
Join Our WhatsApp Community