कोविड काळात पेडणेकरांनी किती खोके घेतले, शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचा सवाल

142

कोविड काळामध्ये मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्याची घोषणा राज्यातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली होती, पण किती रुग्णांच्या नातेवाईकांना ही रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदती केली याची आकडेवारी समोर येऊ द्या, असे आव्हान देत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी शीव रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या जेवणाची फाईल गायब कशी झाली असा सवाल करत एकप्रकारे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला. किशोरीताई आपण कोविड काळात किती खोके घेतले हे याची माहिती सर्वांना असल्याचा आरोपही म्हात्रे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना केला.

शिवसेना शिंदे गटाचा बीकेसीतील दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करताना पक्षाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी यंदाचा दसरा नेहमीपेक्षा गोड असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने कोविडच्या संकटानंतर महाविकास आघाडीचा महारोगालाही दूर केल्याचे सांगितले. आम्ही गद्दारी केली असती तर मेळाव्याला विशाल जनसमुदाय शिवसैनिकांच्या रुपाने आला नसता, आम्ही गददार नाही, तर खुद्दार आहोत,असे त्या म्हणाल्या.

( हेच वाचा: अमित शहा भाजपचे घरगुती मंत्री! उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल )

यांचे सरकार म्हणजे मी मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री अणि शिवसैनिक रस्त्यांवर असे सांगत म्हात्रे यांनी ठाकरे हे कर्माने तर आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत, असे ते म्हणाल्या. अडीच वर्षांत उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री असूनही बाळासाहेबांचे स्मारक बनवता आले नाही, असे सांगत म्हात्रे यांनी उध्दव ठाकरेंच्या ओठांवर बाळासाहेब असून मनात मात्र सोनिया गांधी आणि शरद पवार असल्याचाही आरोप करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  शिवसेनेला वाचवण्याचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. खरी शिवसेना कुणाची या मैदानावरील या भगव्यामय वातारणामुळे  जनतेच्या न्यायालयात तरी बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेणारे शिंदे हेच असतील, हे स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.