- प्रतिनिधी
यंदा विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर होत असलेल्या शिवसेना आणि शिवसेना (उबाठा) पक्षांच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठाचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. शिवसेना पक्ष फुटीनंतर पार पडणाऱ्या या तिसऱ्या दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2024) दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यांच्या माध्यमातून दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याचा अंदाज आहे.
(हेही वाचा – Don Abu Salem : डॉनला तुरुंगात भेटायला आलेली ‘वो कौन थी?’)
पक्ष स्थापनेपासूनच शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर होत असल्यामुळे पक्षफुटीनंतर शिंदे आणि ठाकरे यांच्या नेतृत्वातील दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2024) शिवाजी पार्क मैदानालाच पसंती दिली गेली होती. हे मैदान आपल्यालाच मिळावे म्हणून दोन्हीकडून महापालिकेकडे दावे केले जात होते. यावरुनचा राजकीय वाद अगदी कोर्टापर्यंत गेल्याचे पहायला मिळाले होते.
(हेही वाचा – पाकिस्तानी मौलाना Habibullah Armani याचे वादग्रस्त विधान; म्हणाला “भारतातील हिंदूंना ठार करून…”)
त्यामुळे दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावरून होणारा वाद लक्षात घेऊन यंदा उबाठा कडून ८ महिन्यांपुर्वीच मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केल्याने यंदा शिवाजी पार्क मैदान मिळण्याचा ठाकरेंचा मार्ग सोपा झाला. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शिवाजी पार्क मैदानासाठी फारसा हट्ट न धरता बीकेसी आणि आझाद मैदानासाठी अर्ज केलेला होता. त्यानुसार शिवसेना पक्षाचा मेळावा (Dasara Melava 2024) गतवर्षी प्रमाणे आझाद मैदानावर होत आहे. या दोन्ही मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो शिवसैनिक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community