मागच्या अनेक दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात दसरा मेळाव्यावरुन चढाओढ सुरु आहे. आता या दसरा मेळाव्याचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. पूर्व परवानगी मागूनही पालिकेने अद्याप निर्णय घेतला नल्याचे सांगत ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ठाकरे गटाने गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेकडे परवानगी अर्ज दाखल केला होता. मात्र, महापालिकेच्या जी-उत्तर प्रभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरु आहेत. गणेशोत्सवापूर्वीच ठाकरे गटाने महापालिकेकडे मैदानासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी मैदानासाठी अर्ज दाखल केला. दोन्ही गटांच्या अर्जावर महापालिकेने कोणताही निर्णय घेतला नाही. ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेत मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेवर 22 सप्टेंबर गुरुवारी सुनावणी घेतली जाणार आहे.
( हेही वाचा: कोरोना काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार; शिंदे सरकारचा मोठा निर्णय )
Join Our WhatsApp Community