स्थापत्य शहर समिती अध्यक्षपदी दत्ता पोंगडे यांची निवड!

मुंबई महानगरपालिकेच्‍या स्‍थापत्‍य समिती(शहर) अध्‍यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार दत्ता पोंगडे हे विजयी झाले आहेत. मागील वर्षी उपाध्यक्षपदी असलेल्या दत्ता पोंगडे यांना अध्यक्षा श्रद्धा जाधव यांचा पत्ता कापून उमेदवारी दिली होती. यामध्ये पोंगडे अध्यक्षपदी तर, सचिन पडवळ हे उपाध्यपदी निवडून आले आहेत.

१७ मते मिळवून विजयी

मुंबई महानगरपालिकेच्‍या स्‍थापत्‍य समिती (शहर) समितीच्या (२०२१-२०२२) अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत शिवसेनेचे दत्‍ता पोंगडे हे १७ मते मिळवून विजयी झाले आहेत. पोंगडे यांचे प्रतिस्‍पर्धी उमेदवार भाजपच्या रिटा मकवाना यांना १० मते मिळाली. एकूण ३६ सदस्‍यांपैकी २८ सदस्‍यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. त्‍यातील एक मत बाद झाले. निवडणुकीत तीन सदस्‍य तटस्‍थ राहिले. पाच सदस्‍य गैरहजर होते. मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले.

(हेही वाचाः श्रध्दा जाधव यांच्यासह चार समिती अध्यक्षांचे पत्ते कापले! कारकर,रेडकर मात्र कायम)

उपाध्यक्षपदी पडवळ

यानंतर, स्‍थापत्‍य समिती (शहर) उपाध्‍यक्ष पदासाठी पार पडलेल्‍या निवडणुकीत शिवसेनेचे सचिन पडवळ हे १७ मते मिळवून विजयी झाले. पडवळ यांचे प्रतिस्‍पर्धी उमेदवार असलेल्या भाजपच्या नेहल शाह यांना १० मते मिळाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here