- प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता काम करा. निवडणुकीचा पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात. त्यामुळे लक्षपूर्वक काम करा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी शुक्रवारी पक्षातील कार्यकर्त्याना केली.
नांदेड जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना पवार यांनी राज्यात लवकरच होऊ घेतलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची सूचना केली.
(हेही वाचा – Water Cut : मालाड लिबर्टी गार्डनजवळील जलबोगद्याला गळती; शुक्रवारी रात्रीपासूनच तातडीने कामाला सुरुवात)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सर्व घटकातील लोक कसे सहभागी होतील याकडे लक्ष द्या. पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. जनतेने आपली जबाबदारी पार पाडली असून आता त्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी आपली आहे, याची जाणीव उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना तुम्हाला आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना कधीही येऊ देणार नाही, असा विश्वासही अजित पवार यांनी प्रवेशकर्त्यांना दिला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community