सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरसंदर्भात काही नियमावली दिली असून त्यानुसार राज्यात लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अल्टिमेटम कोणी कोणाला देणार असेल तर ते चालणार नाही. मागच्या काही दिवसात अल्टिमेटम देण्यात येत होता, तशी चर्चा पण होती, पण आम्ही सांगतो तशी भाषा करू नका, कारण सरकार हे अल्टिमेटवर नाही तर कायद्यावर चालतं, असे म्हणज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोला लगावत चांगलेच दरडावल्याचे पाहायला मिळाले आहे.
(हेही वाचा – मौलवींचा मोठा निर्णय! मुंबईतील ‘या’ २६ मशिदींमध्ये भोंग्याविना होणार पहाटेची अजान)
काय म्हणाले अजित पवार?
जो काही निर्णय करायचा तो सर्वांना बंधनकारक असणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ यादरम्यान, भोंगे लावता येणार नाहीत. सध्या राज्यात वातावरण तापले असून भोंग्यावरुन कुणी अल्टिमेटमची भाषा करु नये. कायदा सर्वांना सारखा असतो, सर्वांना कायद्याचे सारखे पालन करावे लागणार आहे. तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर घरात बसून घरच्यांसाठी द्या, आम्हाला सांगू नका, असा इशारा देखील अजित पवारांनी राज ठाकरेंनी दिला आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना अजित पवार असेही म्हणाले की, कायदा हातात घेण्याचे कुणीही धाडस करू नये, न्यायव्यवस्था जो निर्णय देईल त्याची अंमलबजावणी करणे सरकारला बंधनकारक असले. त्यामुळे राज्य कायद्यावर, संविधानावर चालते अल्टिमेटमवर नाही. कोणताही राजकीय पक्ष अशा प्रकारची वर्तवणूक कऱत असेल तर तसे योग्य नाही, जो निर्णय होईल तो सर्वांनाच बंधनकारक असेल.
इथे काही हुकुमशाही नाही, कोणीही अल्टिमेटम देऊ नये
जी काही धार्मिक स्थळे आहेत, त्यांनी परवानग्या घ्याव्यात. लाऊडस्पीकरचा वापर करताना मर्यादा पाळा. न्यायालयाने जे नियम सांगितले आहेत, त्याचे पालन करा, अजूनही ज्या मंदिरांच्या आणि मशिदीच्या भोंग्यांना परवानगी घेतलेली नसेल त्यांनी ती कायदेशीररित्या काढून घ्यावी असे आवाहन करत कायदा कणी हातात घेऊ नये, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, जे कोणी परवानगी घेणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. इथे काही हुकुमशाही नाही, कोणीही अल्टिमेटम देऊ नये. कायद्याने सर्व काही चालते. नियम सर्वांना सारखे असले पाहिजेत, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.
Join Our WhatsApp Community