-
प्रतिनिधी
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी दिले. मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा, असे आदेश त्यांनी दिले.
महत्त्वाच्या विषयांवर बैठक
अणुशक्तीनगर मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, आमदार सना मलिक, माजी मंत्री नवाब मलिक, तसेच वित्त व नियोजन, नगरविकास, बंदरे, मत्स्यव्यवसाय, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – Budget Session 2025 : …त्यामुळे पंडित नेहरूंचाही निषेध झाला पाहिजे; फडणवीसांचे विरोधकांना आव्हान)
अणुशक्तीनगरमध्ये नवीन शिधावाटप कार्यालय
मुंबईतील विद्यमान शिधावाटप कार्यालयांची पुनर्रचना करून अणुशक्तीनगर परिसरात नवीन शिधावाटप कार्यालय सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच, १ एप्रिल रोजी या कार्यालयाचे उद्घाटन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार (DCM Ajit Pawar) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ट्रॉम्बेतील मच्छीमारांसाठी मूलभूत सुविधा
ट्रॉम्बे व मुंबई परिसरातील मच्छीमार समुदायाच्या कल्याणासाठी जाळी विणकाम गृह, सार्वजनिक शौचालय, विद्युतीकरण, पाणीपुरवठा आणि अंतर्गत रस्ते यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल. या सुविधांसाठी नाबार्डकडे ६१ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Ajit Pawar) अधिकाऱ्यांना दिले.
वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारावर भर
मुंबईतील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले. यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढण्यासोबतच नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश
या बैठकीत उपस्थित सर्व विभागांना आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. उपमुख्यमंत्री पवार (DCM Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले की, नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन हे निर्णय घेतले जात असून, त्यांच्या अंमलबजावणीला कोणतीही दिरंगाई चालणार नाही.
या निर्णयांमुळे अणुशक्तीनगर आणि ट्रॉम्बे परिसरातील नागरिकांना महत्त्वपूर्ण सुविधा मिळणार असून, वैद्यकीय शिक्षण आणि मच्छीमारांच्या जीवनमानाच्या सुधारण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community