महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना घवघवीत यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील (Ladki Bahin Yojana) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) सर्वसाधारण सभेनिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. (DCM Ajit Pawar)
दरम्यान, बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न आपल्या देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये उपस्थित झाला आहे. मुंबई, पुणे, कलकत्ता अशा मोठ्या शहरांमध्ये देखील तेथील नागरिक येत आहेत. त्यांना शोधण्याची मोहीम राबवली जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही आम्हाला आधार कार्डशी लिंक करायची होती. मात्र वेळ कमी असल्यामुळे ते शक्य झाले नाही. मात्र आता खरोखरच लाडक्या बहिणींना लाभ द्यायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही हळूहळू पावले उचलत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींचा पैसा रिकव्हर करण्याचा अजिबात विचार नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – माजी मंत्री Tanaji Sawant यांची शिवसेनेवरील नाराजी उघड)
अपात्र लाडक्या बहिणींचेपैसे परत घेणार नाही- तटकरे
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांकडून सरकारने दिलेले पैसे परत घेऊ, असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांनी दोनच दिवसांपूर्वी केले होते. मात्र टीकेची झोड उठताच त्यांनी अपात्र महिलांकडून सरकार पैसे परत घेणार नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. तटकरे यांच्या वक्तव्यावर शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपा मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
(हेही वाचा – अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारे 18 हजार भारतीय मायदेशी परतणार; S. Jaishankar यांची माहिती)
लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9000 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) योजना राज्य सरकारनं जुलै 2024 पासून सुरु केली आहे. या योजनेचे पहिले दोन हप्ते एकत्रितपणे ऑगस्ट महिन्यात देण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर पर्यंत एकूण 6 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आली. म्हणजेच 1500 रुपयांप्रमाणं महिलांना एकूण 9000 हजार रुपये मिळाले आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community