गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सत्तानाट्य सुरू आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळणार का? अशा चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. या सुरू असलेल्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतेही भाष्य न करता ते माध्यमांसमोर आले नव्हते. त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचं अंदाज लावणं देखील अवघड झाले होते. मात्र आज बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात असताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची वाट रोखली. यावेळी राज्यातील घडामोडींबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिल्याचे दिसून आले.
(हेही वाचा – महाराष्ट्रातील राजकीय पेचावर राऊतांचं मोठं ट्वीट, ‘मविआ’ सरकार होणार बरखास्त?)
काय म्हणाले अजित पवार?
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सर्वच घडामोडींवर अजित पवारांचे मौन का? असा प्रश्न उपस्थित होत असताना बुधवारी त्यांनी आपले मौन सोडले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात असताना त्यांना अडवून माध्यम प्रतिनिधींनी सध्याच्या राज्यातील घडामोडींबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले मी दर आठवड्याप्रमाणे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला निघालो आहे. तसेच यावेळी अजित पवारांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर केवळ दोनच शब्दांत उत्तर दिलं. ते म्हणजे NO Comments.
राजकीय वर्तुळात बड्या नेत्यांच्या भेटीगाठींना वेग
अशातच राजकीय नाट्यादरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने सुरू आहे, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. या ट्विटनंतर एकच खळबळ उडाली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे राजीनामा देणार की भाजपचं सरकार पुन्हा येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात बड्या नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे.
Join Our WhatsApp Community