Ajit Pawar : अजित दादा रुसले, पुण्याचे पालकमंत्रीपद मिळवले

107
Ajit Pawar : अजित दादा रुसले, पुण्याचे पालकमंत्रीपद मिळवले
Ajit Pawar : अजित दादा रुसले, पुण्याचे पालकमंत्रीपद मिळवले

रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री पदांचा तिढा आणि भाजपा-शिवसेनेकडून होणारी कोंडी, आदी कारणांमुळे अबोला धरलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रुसवा सोडवण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीसांकडून केला जात आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात अजित पवारांकडे पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. (Ajit Pawar)

अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. हे पद हाती येताच निधी वाटपाचा बंपर धमाका करण्यासाठी त्यांनी ४०० कोटींचे प्रस्ताव रोखल्याची चर्चा होती. पालकमंत्री पद हाती आले नसतानाही ते पुणे जिल्ह्याच्या बैठका घेत होते. परंतु, पुण्यात भाजपाची चांगली कामगिरी सुरू असताना राष्ट्रवादीच्या अजित पवारांना पालकमंत्री पद देण्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. मात्र, दादांनी दबावतंत्राचा वापर करून पुण्याचे पालकमंत्री पद स्वतःच्या पदरात पाडून घेतले आहे. (Ajit Pawar)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी, ४ ऑक्टोबरला राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली. या यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर, चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली आहे. (Ajit Pawar)

(हेही वाचा – I.N.D.I.A. : मुंबईतील लोकसभा सीट वरून I.N.D.I.A. आघाडीत धुसपुस…)

नवे पालकमंत्री असे…

पुणे – अजित पवार

अकोला – राधाकृष्ण विखे-पाटील

सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील

अमरावती – चंद्रकांत दादा पाटील

भंडारा – विजयकुमार गावित

बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर – हसन मुश्रीफ

गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम

बीड – धनंजय मुंडे

परभणी – संजय बनसोडे

नंदूरबार – अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.