महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (१० नोव्हेंबर) सायंकाळी दिल्ली गाठून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अजित पवार यांनी अचानक भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. यावेळी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. (Ajit Pawar)
अजित पवार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशील कळू शकला नाही. परंतू निवडणूक आयोगात सुरु सुनावणीच्या मुद्यावर चर्चा झाली असल्याचे समजते. याशिवाय राज्यातील राजकीय घडामोडींवर सुद्धा चर्चा झाली असे सूत्राचे म्हणणे आहे. अजित पवार आणि गृहमंत्री अमित शहा यांची ही भेट तब्बल दीड तासांची होती. यामुळे भेटीमागचे कारण गंभीर असावे अशी चर्चा रंगली आहे. (Ajit Pawar)
(हेही वाचा – National Ayurveda Day : प्रत्येक व्याधीला ‘मेडिसिन’ हा पर्याय नाही – वैद्य संतोष जळूकर)
दरम्यान याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आणि प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव म्हणाले की, आजची भेट ही दिवाळीची शुभेच्छा देण्यासाठी घेण्यात आली होती. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही आणि या भेटीचा राजकीय अर्थ काढला जाऊ नये. राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न करने म्हणजे दिवाळीसारख्या सणाचे महत्व कमी करने होईल, असेही श्रीवास्तव म्हणाले. (Ajit Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community