करचोरी, करगळती रोखून कर्तव्यात हयगय न करता रिझल्ट ओरियंटेड काम करा; DCM Ajit Pawar यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

45
करचोरी, करगळती रोखून कर्तव्यात हयगय न करता रिझल्ट ओरियंटेड काम करा; DCM Ajit Pawar यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
  • प्रतिनिधी

महायुती सरकारच्या मंत्र्यांचे खातेवाटप होताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले असून करसंकलन आणि महसुलवाढीच्या प्रक्रियेत सुसुत्रता, सुधारणा आणत ‘रिझल्ट ओरियंटेड’ काम करण्याचे सक्त निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) मंगळवारी आपल्या मंत्रालयातील आपल्या समिती कक्षात घेतलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ चाललेल्या बैठकीत बोलताना दिले. त्याचवेळी अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करतानाच करचोरी, करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

(हेही वाचा – PM Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महाराष्ट्राला २० लाख घरे मिळणार)

यावेळी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲड. अशिष जयस्वाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वस्तू व सेवा कर विभागाचे राज्य आयुक्त आशिष शर्मा, वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) सचिव शैलजा ए., लेखा व कोषागारे विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपसचिव रविंद्र औटे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त विश्वनाथ इंदिसे, सहआयुक्त सुनिल चव्हाण, अपर आयुक्त यतीन सावंत, उपायुक्त सुभाष बोडखे, उपायुक्त शंकर जगताप आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (DCM Ajit Pawar)

(हेही वाचा – Award : यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन)

उपमुख्यमंत्री पवार (DCM Ajit Pawar) यांनी यावेळी प्रलंबित योजना, आवश्यक निधी, तसेच राज्याच्या उत्पन्नाचा आढावा घेतला. या बैठकीत राज्यातील महसुली सुधारणा, शेती विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यांसारख्या विविध विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वित्तीय योजना आणण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. करसंकलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्यात येतील. परंतु कामात परिस्थितीत हयगय चालणार नसल्याचे सांगत रिझल्ट ओरियंटेड काम करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचवेळी राज्यातील बेकायदा दारूविक्रीवरही कडक निर्बंध आणण्यासाठी पारदर्शक व्यवस्था उभारण्याचे सक्त निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.