राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. परंतु आता हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कुठे घ्यायचे या प्रश्नावर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मुंबईत घेण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. या भूमिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले अजित पवार
आर्थिक वर्ष संपल्यानंतर जेव्हा अधिवेशन सुरु होते त्यावेळी राज्यपालांचे अभिभाषण होते यासाठी एवढे मोठे सभागृह नागपूरात नाही. पुढे ते म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना याचा धोका आहे असे तज्ञांनी, टास्क फोर्सनी सांगितले होते. तिसऱ्या लाटेत मुंबईमध्ये कोरोनाची मोठी लाट आली. संख्या जेवढ्या वेगाने वाढली तेवढ्या वेगाने कमीही झाली. मात्र प्रत्येकाची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. यातून हा विचार करण्यात आला. आणि अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
(हेही वाचा – सोनिया गांधींचं घरभाडं भरण्यासाठी भाजप देणार देणगी!)
म्हणून यंदाचे अधिवेशन मुंबईला
पुढे अजित पवारांनी असेही स्पष्ट केले की, मागच्या अधिवेशनात १५ ते २० मंत्री पाॅझिटीव्ह झाले. यामुळे पाच दिवसात अधिवेशन संपविले. अजून अधिवेशन पुढे चालू ठेवले असते तर ही संख्या वाढली असती. म्हणून यंदाचे अधिवेशन मुंबईला घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवारांनी सांगितले. दरवर्षी एक अधिवेशन नागपूरला घ्यावे असा करार आहे. पण कोरोनाचे संकट असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे.
Join Our WhatsApp Community