श्री गणरायाला निरोप देताना DCM Devendra Fadanvis यांनी बाप्पाकडे मागितले अनोखे मागणे; म्हणाले…

गेले दहा दिवस गणरायाच्या सहवासामध्ये कसे गेले ते कळलेच नाही. बाप्पांना निरोप देण्याचा क्षण आला आहे. यावेळी गणरायाकडे जनतेच्या सर्व चिंता-विघ्ने दूर करावे आणि पुढच्या वर्षी अशाच प्रकारे हसत खेळत आनंद घेऊन लवकर यावे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

89

मंगळवारी, १७ सप्टेंबर रोजी राज्यभर अनंतचतुर्दशीची धामधूम सुरु आहे. सर्वत्र बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (DCM Devendra Fadanvis) यांनीही त्यांच्या घरात विराजमान श्री गणेशाला भावपूर्ण निरोप दिला. त्यावेळी त्यांनी बाप्पाकडे अनोखे मागणे मागितले.

(हेही वाचा Lalbaugcha Raja 2024 : लालबागचा राजाच्या चरणी आली राजकीय चिठ्ठी; काय आहे प्रार्थना ?)

गणपती बाप्पााने आम्हालाही सुबुद्धी द्यावी

गेले दहा दिवस गणरायाच्या सहवासामध्ये कसे गेले ते कळलेच नाही. बाप्पांना निरोप देण्याचा क्षण आला आहे. यावेळी गणरायाकडे जनतेच्या सर्व चिंता-विघ्ने दूर करावे आणि पुढच्या वर्षी अशाच प्रकारे हसत खेळत आनंद घेऊन लवकर यावे. तसेच गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. त्याने सर्वांची विघ्न दूर करावीत. गणपती हा बुद्धीची देवता आहे. त्यामुळे गणपती बाप्पााने आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना सर्वात जास्त बुद्धीची गरज आहे त्यांनाही द्यावी, असे मागणे देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी त्यांच्या गणरायाकडे मागितले. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे म्हटले जात आहे. अनेक जागांवर एकमत झाले असून, काही जागांवरील निर्णय लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास दोन्ही गटांकडून केला जात आहे. यातच अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी घरी विराजमान झालेल्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.