Maratha Reservation : फडणवीस यांची दिल्लीत शहांसोबत चर्चा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे.

97
Maratha Reservation : फडणवीस यांची दिल्लीत शहांसोबत चर्चा
Maratha Reservation : फडणवीस यांची दिल्लीत शहांसोबत चर्चा

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे गुरुवारी (०२ नोव्हेंबर) पुन्हा एकदा दिल्लीत दाखल झालेत. उभय नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यावर विस्तृत चर्चा केली. (Maratha Reservation)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज तातडीने दिल्ली गाठून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दीनदयान उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयात उभय नेत्यांनी विस्तृत चर्चा केली. मात्र, चर्चेचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. यामुळे भविष्यात परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात, या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य आणि केंद्र पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Gyanvapi Case : ज्ञानवापी सर्वेक्षण प्रकरणी न्यायालयाचा पुरातत्व विभागाला दिलासा)

महत्वाचे म्हणजे, गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची महत्वाची बैठक आज मुख्यालयात बोलाविली होती. फडणवीस आणि बावनकुळे हेही या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आजच्या बैठकीत कोणता तोडगा काढला जातो? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महत्वाचा मुद्या असा की, उत्तरप्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र होय. महाराष्ट्रात ४८ जागा असून भाजपने ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अशात, मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर हे लक्ष्य गाठता येणार नाही याची जाणीव भाजपला आहे. (Maratha Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.