कोरोनामध्ये घरातील कर्ता पुरुष गमावणाऱ्या 263 कुटुंबांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे दिवाळी साजरी केली. या सर्व कुटुंबांना धान्य किट, दिवाळीचा फराळ व भाऊबीजेची रक्कम दिली. हे आपले सरकार आहे. कोरोनाग्रस्त तसेच अतिवृष्टीमुळे त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणार, असे म्हणत फडणवीसांनी आश्वासन दिले. कोरोना काळातील 2 वर्षानंतर दिवाळी साजरी करताना ज्यांच्या घरात या आजारामुळे कायमचे दुःख आले आहेत, त्या बंधू भगिनींना बाजूला ठेवू नका. त्यांच्यासह दिवाळी साजरी करा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
(हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिपाली सय्यद म्हणतात, “…तरंच आपण त्यांच्याबरोबर जायला हवं”)
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे माजी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनतून श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट यांच्यावतीने कोरोनाग्रस्तांसाठी ‘सोबत पालकत्व प्रकल्प’ राबविला जात आहे. या संस्थेने नागपूर जिल्ह्यातील 263 कुटुंबांचे पालकत्व घेतले आहे. आमदार प्रवीण दटके, संदीप जोशी, जिल्हाधिकारी, 263 कटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.
फडणवीसांनी दिली हमी
यावेळी फडणवीस म्हणाले, या संस्थेने अतिशय विदारक परिस्थितीमध्ये, जेव्हा शासनाकडून मदतीची घोषणा व्हायची होती त्या सुरुवातीच्या काळात संवेदनशीलतेने या कामाला सुरुवात केली. कोविड विधवा महिला व त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली. शाळेत शिक्षण घेतांना मुलांना काही अडचणी आहेत. ते आणि असे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देतो. तसेच सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) व काही देणगी मिळवून हा प्रश्न सोडविण्याची हमी देतो.
Join Our WhatsApp Community