भाजपा मुख्यमंत्र्यांच्या पंक्तीत DCM Devendra Fadnavis यांना स्थान; पहिल्या रांगेत बसवले

174
भाजपा मुख्यमंत्र्यांच्या पंक्तीत DCM Devendra Fadnavis यांना स्थान; पहिल्या रांगेत बसवले
भाजपा मुख्यमंत्र्यांच्या पंक्तीत DCM Devendra Fadnavis यांना स्थान; पहिल्या रांगेत बसवले

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध घडामोडी घडत आहेत. दरम्यान, दिल्लीत झालेल्या भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या पंक्तीत मानाचं स्थान देण्यात आले. महाराष्ट्रातील राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा शब्द भाजपाच्या पक्षांतर्गत निर्णयात महत्त्वाचा मानला जातो. तसेच केंद्रीय पातळीवरही फडणवीसांचं महत्व वाढत आहे. हे यातून दिसून येत आहे. या कार्यक्रमाचा फोटो समोर आला असून त्यात फडणवीसांना पहिल्या रांगेत बसवण्यात आल्याचं दिसून येते. (DCM Devendra Fadnavis)

दिल्ली येथे भाजपा मुख्यमंत्री परिषदेच्या (BJP Chief Minister’s Council) दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी पक्षाच्या मुख्य कार्यालयात बैठक पार पडली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपाचे संघटन महासचिव बीएल संतोष यांच्यासह भाजपाशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजर होते.  (DCM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Award Ceremony : हिंदुस्थान पोस्टचे संपादक स्वप्निल सावरकर यांचा मराठा तलवार देऊन विशेष सन्मान)

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. परंतु भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेत फडणवीसांना पुढच्या रांगेत बसवण्यात आलं होतं. पहिल्या रांगेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath), दुसऱ्या बाजूला आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा (CM hemant biswa sharma) हे आहेत. आसामच्या मुख्यमंत्र्याशेजारी देवेंद्र फडणवीसांना बसण्याचा मान देण्यात आला. गोव्याचे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीही पहिल्या रांगेत अखेरच्या बाजूस बसले होते. २७ आणि २८ जुलैला भाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची ही परिषद होती. पण या बैठकीला देवेंद्र फडणवीसही हजर होते. फडणवीस यांना प्रोटोकॉल तोडून पहिल्या रांगेत स्थान दिल्याचं या फोटोवरून दिसून येते.  (DCM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Top Hospital in Mumbai : मुंबईतील प्रमुख प्रसूती रुग्णालये)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचं ठरवलं होतं. त्यांनी पक्षनेतृत्वाकडे सरकारबाहेर राहून पक्ष वाढवण्यासाठी काम करू, मला या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती केली. मात्र दिल्लीतील पक्ष नेतृत्वाने फडणवीसांचं महत्त्व ओळखून त्यांना सरकारमध्येच कायम राहण्याचा आदेश दिला. आता पक्षाकडून मुख्यमंत्री परिषदेत फडणवीसांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान देण्यात आला. (DCM Devendra Fadnavis)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.