विधानसभा जागा वाटपावर DCM Devendra Fadnavis यांचा आत्मविश्वास; महायुतीचा ‘पेपर’ जवळपास पूर्ण

317
विधानसभा जागा वाटपावर DCM Devendra Fadnavis यांचा आत्मविश्वास; महायुतीचा 'पेपर' जवळपास पूर्ण

महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी महायुतीच्या जागा वाटपावर बोलताना महत्त्वपूर्ण संकेत दिले. ते म्हणाले की, ‘महायुतीच्या जागा वाटपाबाबत ८० टक्के निर्णय झाला आहे, उर्वरित २० टक्के निर्णयही लवकरच घेतला जाईल.’ त्यांच्या या विधानातून भाजपाच्या महायुतीचा ‘पेपर’ जवळपास पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले, यावरून त्यांचा निवडणूक तयारीचा आत्मविश्वास दिसून येत आहे.

(हेही वाचा – Navratri 2024 : भाजपचा मराठी दांडिया उत्सव; नवरात्रोत्सवात सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क)

हरियाणाच्या विधानसभा निकालांमुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर टीका करत सांगितले की, ‘हरियाणा निकालामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भाजपाला टार्गेट करण्याची संधी मिळाली नाही. हरियाणा निकालांमुळे देशातील लोकांचा मूड स्पष्ट झाला आहे, त्यामुळे आता विरोधक हम आपके हैं कौनसारखी भूमिका घेत आहेत. फडणवीस यांनी दावा केला की लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह तयार केला होता, परंतु तो आता पूर्णतः निष्प्रभ झाला आहे. या विधानातून फडणवीसांनी (DCM Devendra Fadnavis) विरोधकांना स्पष्ट संदेश दिला की, आगामी निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा निर्णायक स्थितीत राहील. फडणवीस यांनी वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील प्रकल्पांवरही प्रकाश टाकला.

(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi ची दुसरी उमेदवार यादी जाहीर)

विदर्भातील पाच नवीन मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन तसेच नागपूरसाठी १३ हजार कोटींच्या आधुनिक विमानतळाच्या विकासाबद्दल त्यांनी माहिती दिली. यासोबत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ५२ नवीन हॉस्टेल्सची उभारणीही महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. या योजना आणि विकास प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान मिळेल, असे फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.