ओडिशामधील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ शुक्रवारी रात्री यशवंतपूरहून हावड्याकडे जाणारी दुरांतो एक्सप्रेस रुळावरून घसरून हावड्याहून चेन्नईकडे जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला धडकली. यानंतर कोरोमंडलचे अनेक डब्बे रुळावरून घसरले आणि मालगाडीला धडकले. या भीषण दुर्घटनेमध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
(हेही वाचा – Odisha Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशा दौऱ्यावर)
प्रसार माध्यमांसोबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘ओडिशामध्ये रेल्वेचा जो अतिशय दुर्दैवी अशाप्रकारचा अपघात झालाय, त्यामध्ये जे लोकं मृत्यूमुखी पडले, त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. ही घटना अतिशय दुःखद आहे. आणि हा जो काही आघात आहे तो सहन करण्याची शक्ती ईश्वराने त्या परिवारांना द्यावी, अशी ईश्वरी चरणी प्रार्थना आहे. जे लोकं जखमी आहेत, त्यांना लवकर आरोग्य लाभ व्हावा, अशी देखील ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे.’
दरम्यान ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि गंभीर जखमींना दोन लाखांची मदत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. तसेच अपघातातील किरकोळ जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community