‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाचा दाखला देत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणून पवारांचे मानले आभार

207
'लोक माझे सांगाती' पुस्तकाचा दाखला देत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणून पवारांचे मानले आभार
'लोक माझे सांगाती' पुस्तकाचा दाखला देत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणून पवारांचे मानले आभार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी, १८ मे रोजी पुण्यातील भाजपच्या कार्यक्रमातून ठाकरेंवर शरशंधान साधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा दाखला देत फडणवीसांनी ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल केला. यावेळी फडणवीसांनी पुस्तकातील दहा वाक्य वाचत ठाकरेंवर दहा टीकेचे बाण सोडले.

नक्की काय म्हणाले फडणवीस?

‘आता एक पुस्तक आले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे ‘लोक माझे सांगाती.’ मी खोटे सांगत नाही. पृष्ठ क्रमांक ३१८ आणि ३१९ यावर जे लिहिले आहे त्यातली दहा वाक्य सांगतो. वज्रमुठीचे प्रमुख शरद पवार हे वज्रमुठीचा चेहरा उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणतात?, असे म्हणत फडणवीसांनी पुस्तकातील दहा वाक्य वाचली.

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी हिरवा रंग अंगीकारल्यामुळे संजय राऊतांकडून लव्ह जिहादचा प्रचार; सोमय्यांची जहरी टीका)

फडणवीसांनी कोणती दहा वाक्य वाचली?

  1. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या संवादातली सहजता उद्धव ठाकरेंसोबत नव्हती.
  2. उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी नसे. जी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे होती.
  3. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती.
  4. त्यांचे कुठे काय घडते आहे याचे बारीक लक्ष नसे.
  5. उद्या काय घडते आहे याचा अंदाज घ्यायची क्षमता असायला हवी होती ती नव्हती.
  6. ते ओळखून काय करायचे याचे राजकीय चातुर्य असायला हवे होते, त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती.
  7. त्यांना अनुभव नसल्याने हे सगळे घडत होते. तरीही हे टाळता येणे त्यांना जमले नाही.
  8. महाविकास आघाडी सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी माघार घेतली. संघर्ष न करता माघार घेतली.
  9. उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते पण ऑनलाईन. टोपे, अजितदादा आणि इतर मंत्री मात्र प्रत्यक्ष संपर्कात होते.
  10. उद्धव ठाकरेंचे फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणे हे आमच्या पचनी पडणारे नव्हते.

अशाप्रकारे पुस्तकातील दहा वाक्य वाचून झाल्यानंतर फडणवीस म्हणाले की, ‘हे सगळे आम्ही म्हटले आहे का? हे सगळे शरद पवारांनी म्हटले आहे. आम्ही जेव्हा उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत म्हणत होतो तेव्हा आम्हाला महाराष्ट्र द्रोही ठरवले गेले. चंद्रकांत पाटील यांनाही असेच म्हटले आहे. आता वज्रमुठीच्या प्रमुखांनी वज्रमुठीच्या चेहऱ्याबद्दल जी वाक्य लिहून ठेवली आहेत त्याबद्दल मी शरद पवारांचे कोटी कोटी आभार मानतो.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.