महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने घोषित केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. या योजनेबद्दल माता-भगिनींच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) येत्या रविवारी (१८ ऑगस्ट) रोजी राज्यातील लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाने या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यासाठी पुढाकार घेत हा ‘लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’ कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शुक्रवारी (१६ ऑगस्ट) दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
(हेही वाचा – पश्चिम बंगाल सरकारची Calcutta High Court कडून कानउघाडणी; रुग्णालयावरील हल्ल्यावरून व्यक्त केला संताप)
यावेळी वाघ (Chitra Wagh) यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व येथील महापालिकेच्या मैदानामध्ये १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला १० हजार महिला उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून प्रत्येक जिल्ह्यातील दोन बहिणी फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहेत.
(हेही वाचा – Election Commission: जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; जाणून घ्या ‘या’ तारखेला होणार मतदान)
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महायुती सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ केवळ घोषित केली नाही तर भरीव निधीची तरतूद करून योजना अंमलात आणली आहे. लाडकी बहीण योजना असो वा समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी महायुती सरकारने (Mahayuti Govt) आणलेल्या योजना असोत, त्यांच्या यशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात धडकी भरली आहे. म्हणूनच या ना त्या प्रकारे या योजनांमध्ये खोडा घालण्याचा हीन प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करत आहेत अशा शब्दांत वाघ यांनी मविआच्या नेत्यांचा समाचार घेतला. बारामतीच्या मोठ्या ताईंना दीड हजाराचे मोल कळणार नाही मात्र या योजनेमुळे राज्यातील माता-भगिनी खूष असून त्या महायुती सरकारला आशीर्वाद देत असल्याचेही वाघ (Chitra Wagh) यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community