-
प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे कैलास बोराडे यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने राज्यभरात तीव्र संताप निर्माण झाला आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी न घालता कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले.
घटनेचा विधान परिषदेत मुद्दा उपस्थित
भोकरदन येथील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी विधान परिषदेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले की, “ही घटना केवळ दुर्दैवी नाही तर माणुसकीला काळीमा फासणारी आहे. संबंधित गुन्हेगारांना कठोर शासन होईल आणि त्यांना मकोका लावण्याच्या प्रक्रियेसाठी गृह विभाग कार्यवाही करेल.”
(हेही वाचा – MLA Residence : मंत्र्यांकडून आमदार निवासातील खोल्या अद्याप रिकाम्या नाहीच)
गृहमंत्री व पोलिस प्रशासनाची तत्परता
या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी जालना जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांशी त्वरित चर्चा केली. तसेच, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री घटनास्थळी भेट देणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “बोराडे यांना झालेली मारहाण इतकी क्रूर आहे की, त्याचा व्हिडीओ पाहूनही अंगावर शहारा येतो. या अमानुष कृत्याला कोणताही राजकीय वा सामाजिक पाठींबा दिला जाणार नाही.”
बोराडे यांच्यावर उपचार सुरू – सरकार पाठीशी
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कैलास बोराडे यांना तातडीने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Eknath Shinde) त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याच्या सूचना दिल्या आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. “मी स्वतः बोराडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि सरकार त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली,” असे शिंदे यांनी सांगितले.
(हेही वाचा – कोर्टाच्या तारखा लवकर मिळतात, पण एमआरआय-सिटी स्कॅनसाठी प्रतीक्षा ; Rahul Narwekar यांची नाराजी)
गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा इशारा
“या घटनेतील गुन्हेगारांना अजिबात पाठीशी घालणार नाही. गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून गृह विभागाच्या माध्यमातून ‘मकोका’ लावण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल,” असे उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Eknath Shinde) स्पष्ट केले.
या घोषणेमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community