“अडीच वर्षांपूर्वी तुम्ही शिवसेना गहाण टाकण्याचे पाप केले. बाळासाहेबांचे विचार सोडण्याचे पाप केले, ते धुवण्यासाठी मी प्रयागराजला गेलो होतो, तुम्ही मात्र लंडनला जाता,” अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे गटावर केली. जुन्नरमधील नारायणगाव येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते. यावेळी जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे (Sharad Sonavane) यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
उबाठावर जोरदार टीका
शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी उबाठावर हल्लाबोल करत, “मी कामातून उत्तर देतो, टीकेला नाही. गुवाहाटीला गेलेल्या महिला आमदारांवरही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने खालच्या शब्दांत टीका केली. महाकुंभात ६५ कोटी लोकांनी स्नान केले, आम्हीही गेलो, त्यावरही त्यांनी टीका केली. तुम्ही शिवसेना गहाण टाकण्याचे पाप केले, ते धुवण्यासाठी मी प्रयागराजला गेलो,” असे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – पालघर जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालयासाठी जमीन उपलब्ध करणार; Chandrashekhar Bawankule यांची घोषणा)
शरद सोनावणे यांचा प्रवेश – उबाठाला खिंडार
यावेळी जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे (Sharad Sonavane) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत बाबू पाटे, विकास रेपाळे, देवराम लांडे, प्रसन्ना डोके, रोहन शिंदे, संगीता वाघ, अलका फुलपगार यांच्यासह आंबेगाव-जुन्नर तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
“मी खुर्ची शोधणारा नाही, माणसं शोधणारा”
शिंदे (DCM Eknath Shinde) पुढे म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना कधीही जाती-धर्माचा विचार केला नाही. अडीच वर्षांपूर्वी रिक्षाने मर्सिडीजला मागे टाकले. जेव्हा शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले, शिवसेना संकटात आली, तेव्हा आम्ही उठाव केला. त्यामुळे ‘लाडकी बहिण’ योजना सुरू करता आली आणि ती कधीही बंद होणार नाही.”
(हेही वाचा – Shiv Sena UBT पक्षाचा कोणता शिलेदार विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होणार?)
महायुती सरकारमुळे महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला होता. मात्र, महायुतीच्या सरकारने राज्य पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणले. “कॉमन मॅनला सुपर मॅन करायचे आहे. अडीच वर्षांत शेतकऱ्यांना ४५,००० कोटींची मदत केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून ४६० कोटींची मदत करत हजारो रुग्णांचे प्राण वाचवले,” असे त्यांनी सांगितले.
“गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक”
शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, “लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हीच माझी ओळख सर्वात मोठे पद आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी प्रयत्न करा.” त्यांच्या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच ऊर्जा संचारली.
शिंदे गटाची ताकद वाढली
शरद सोनावणे (Sharad Sonavane) यांच्या प्रवेशाने जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली असून उबाठाला मोठा धक्का बसला आहे. आगामी निवडणुकांमध्ये हा बदल निर्णायक ठरू शकतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community