
-
प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांना वारकरी संप्रदायातील मानाचा ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विधानसभेत अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला, ज्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “हा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. यामुळे माझी जबाबदारी वाढली असून, सर्वसामान्यांचे दुःख दूर करणे हाच माझा धर्म आहे,” असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी सांगितले की, “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, तर मला आशीर्वाद देणाऱ्या वारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, माझ्या लाडक्या बहिणींचा आणि भावांचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मला हिंदुत्व आणि महाराष्ट्र सेवेचे व्रत दिले, तर धर्मवीर आनंद दिघे यांनी जनसेवेचे संस्कार दिले. तुकोबांच्या नावाचा हा पुरस्कार माझ्या या संस्कारांचा सन्मान आहे.” त्यांनी तुकाराम महाराजांच्या “भले देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी” या ओळी आपल्याला प्रिय असल्याचे सांगितले. “एखाद्याने जीव लावला तर त्याला सर्वस्व द्यायचे आणि दगाफटका केला तर वठणीवर आणायचे, हीच तुकोबांची शिकवण मी आयुष्यभर जपली,” असे ते म्हणाले.
(हेही वाचा – रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा; Chhatrapati Sambhaji Raje यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र)
वारकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय
उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी आपल्या कार्यकाळातील वारकऱ्यांसाठीच्या योगदानाचा उल्लेख केला. “इतिहासात प्रथमच आमच्या सरकारने वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी अनुदान दिले. वारकरी विमाछत्र योजनेत विमा काढला, वारीत लाखो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. पालखी मार्ग आणि पंढरपूरच्या विकासाला गती दिली. विठूरायाच्या दर्शन रांगांसाठी तात्काळ निधी दिला. मंदिर हे संस्कारांचे केंद्र आहे, म्हणून बी कॅटेगरी तीर्थक्षेत्र मंदिरांचा निधी दोन कोटीवरून पाच कोटी केला. वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती केली,” असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “वारकऱ्यांपेक्षा कोणी व्हीआयपी नाही. पंढरपूरला गेलो तर व्हीआयपी ताफा बाजूला ठेऊन बुलेटवर फिरलो. ही मदत उपकार नाही, कारण वारकरी संप्रदायाचे उपकार सात जन्मातही फेडता येणार नाहीत.”
(हेही वाचा – Uday Samant यांचा कुणाल कामरा प्रकरणावर हल्लाबोल; म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग…)
भावनिक उद्गार आणि प्रार्थना
“या पुरस्कारामुळे मला कॉमन मॅनला सुपरमॅन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना मी करतो,” असे भावनिक उद्गार उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी काढले. या पुरस्काराने त्यांची सामाजिक आणि राजकीय जबाबदारी वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. विधानसभेत उपस्थित सर्वांनी त्यांच्या या वक्तव्याचे टाळ्यांनी स्वागत केले.
हा पुरस्कार उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांना त्यांच्या जनसेवेच्या कार्यासाठी देण्यात आला असून, यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अलीकडेच कुणाल कामरा प्रकरणात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती, त्यानंतर हा पुरस्कार त्यांच्या नेतृत्वाला मिळालेली पावती मानला जात आहे. या घटनेमुळे उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांची लोकप्रियता आणि वारकरी संप्रदायातील प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community