‘तिकडे लागली वाळवी, म्हणून इकडे आले साळवी; Rajan Salvi यांच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

137

शिवसेना उबाठाचे (Shivsena) माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी शिवबंधन तोडत उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रक्षात प्रवेश करत धनुष्णबाण हाती घेतला आहे. याचवेळी त्यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आले. तसेच पक्षप्रवेशावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठावर फटकेबाजी केली आहे. (Rajan Salvi)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला जोरदार टोला लगावला आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशादरम्यान बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “कोकणातील ढाण्या वाघ शिवसेनेच्या गुहेत परत आला. या पक्षात राजा का बेटा राजा नही बनेगा. जो काम करणार तोच पुढे जाणार. शिवसेना हा पक्ष हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. जिथे विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी. जिथे लागेल वाळवी तिथे कसा राहील राजन साळवी असे बॅनर मी वाचले.”

राजन साळवी अखेर शिवसेनेत

मागील अनेक दिवसांपासून राजन साळवी हे शिवसेना उबाठा पक्षामध्ये नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या नाराजीची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा झाली. मात्र आता राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवेश करतेवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्री उदय सामंत (Uday Samanat) आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश झाला. 

(हेही वाचा – Prayagraj Kumbh Mela 2025 : महाकुंभपर्वातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला ७५ हजारांहून अधिक भाविकांनी दिली भेट !)

राजन साळवी यांनी पक्षप्रवेशापूर्वी पत्रकार परिषद घेत शिवबंधन तोडण्याचे कारण देखील सांगितले आहे. राजन साळवी म्हणाले की, “नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं. विनायक राऊत (Vinayak Raut) हेच माझ्या प्रभावाला कारणीभूत असून, त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केलं. याबाबत मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुरावे दिले आहेत. मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे,” असे मत राजन साळवी यांनी व्यक्त केले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.