DCM Eknath Shinde यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा धक्का; मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पदांवर बदल

111
DCM Eknath Shinde यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा धक्का; मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पदांवर बदल
  • प्रतिनिधी

राज्यातील महत्त्वाच्या मित्रा संस्था (Maharashtra Institution for Transformation) मध्ये उपाध्यक्ष पदांवर मोठे बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (DCM Eknath Shinde) मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारणा करत दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, वादग्रस्त बिल्डर अजय आशर यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

(हेही वाचा – पन्हाळागड होणार शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा)

शिंदे समर्थक बाहेर, नव्या चेहऱ्यांना संधी

एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या काळात शिवसेनेचे दोन निकटवर्तीय मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष होते. मात्र, आता फडणवीस यांनी निर्णय घेत तीन नवीन उपाध्यक्षांची निवड केली आहे. विशेषतः, एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि वादग्रस्त बिल्डर अजय आशर यांची उपाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आशर यांच्याकडे या संस्थेतील महत्त्वाची जबाबदारी होती, मात्र नव्या निर्णयाने त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

(हेही वाचा – Ayushman Card : आता एका क्लिकवर डॉक्टरांना मिळणार रुग्णांचा वैद्यकीय इतिहास)

नवीन उपाध्यक्षांची निवड

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपा आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यासोबतच, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मात्र आपल्या उपाध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत.

(हेही वाचा – Mahakumbh मुळे रोजगार, आर्थिक उत्पन्न किती वाढलं ? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी दिली आकडेवारी)

फडणवीसांचा राजकीय डाव?

या बदलांमुळे मित्रा संस्थेवरील शिवसेनेचा प्रभाव कमी झाला असून, भाजपाने आपली पकड मजबूत केली आहे. फडणवीस यांनी एकीकडे भाजपा आमदाराची वर्णी लावत आपली ताकद वाढवली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप वळसे पाटील यांना संधी देत, नव्या समीकरणांना चालना दिली आहे.

हा निर्णय महायुतीतील सत्ता संघर्षाची झलक असल्याचे बोलले जात आहे. मित्रा संस्थेवरील या नव्या नियुक्त्यांमुळे शिवसेनेच्या नेतृत्वाला धक्का बसला आहे, तर फडणवीस यांनी आपल्या हातात अधिक नियंत्रण घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.