![आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात DCM Eknath Shinde यांचा समावेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात DCM Eknath Shinde यांचा समावेश](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/01/image-2025-01-30T080413.046-696x464.webp)
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांना वगळण्यात आले होते, त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. विरोधी पक्षांनीही यावरून सरकारला लक्ष्य केले होते. मात्र, अखेर या प्राधिकरणाच्या नियमात सुधारणा करून शिंदे यांना पुन्हा या समितीत समाविष्ट करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Cabinet Meeting : पालक सचिवांच्या निष्क्रियतेमुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी)
राज्यमंत्रीमंडळाचा निर्णय
राज्यमंत्रीमंडळाने मंजूर केलेल्या सुधारित रचनेनुसार, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये अध्यक्ष आणि नऊ सदस्य असतील.
- मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतील.
- उपमुख्यमंत्री हे पदसिद्ध सदस्य असतील.
- इतर मंत्र्यांना मुख्यमंत्री प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करतील.
- आपत्ती जोखीम कमी करण्याचे ज्ञान व अनुभव असलेल्या व्यक्तींना अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करता येईल.
- राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष पदसिद्ध सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश राहील.
राजकीय वादावर पडदा
महाराष्ट्रातील सत्तेत भाजपानंतर शिवसेना हा महत्त्वाचा घटकपक्ष आहे, ज्यांच्याकडे ५७ आमदार आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४१ आमदार आहेत. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांचा प्राधिकरणात समावेश असताना, एकनाथ शिंदेंना वगळल्याने नाराजी पसरली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नियमात बदल करून राजकीय तणाव टाळला.
(हेही वाचा – Delhi Assembly Election : भाजपाला दिल्ली काबीज करता आली कारण…)
मुंबई महापुरानंतर स्थापन समिती
जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या महापुरानंतर राज्य सरकारने या समितीची स्थापना केली होती. आपत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करते आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधते. नव्या रचनेनुसार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असतील.
- अर्थमंत्री अजित पवार, महसूल, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विभागाचे मंत्री यांचा समावेश करण्यात आला आहे.
- एकनाथ शिंदे यांचा देखील आता अधिकृत समावेश करण्यात आला आहे.
शिंदे गटातील नाराजी दूर
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून वगळल्याने शिंदे गटात नाराजीचे वातावरण होते. मात्र, नव्या निर्णयामुळे या वादावर पडदा पडला आहे आणि महायुतीतील समन्वय कायम राहणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी “डिझास्टर मॅनेजमेंट” करून राजकीय आपत्ती टळवली, असे बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community