महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात शिवसेनेची भूमिका कायमच मराठी भाषिकांच्या बाजूने राहिलेली आहे. बेळगावमधील मराठी भाषिकांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी आहे. महाराष्ट्र सरकारनेही एकमताने ठराव करून त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न (maharashtra-karnataka border dispute) माझ्या जिव्हाळ्याचा आहे कारण सीमाप्रश्नी १९८६ साली झालेल्या आंदोलनात मी बेळगावच्या तुरुंगात होतो. त्यामुळे बेळगावच्या मराठी भाषिकांबद्दल माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde)यांनी केले. (DCM Eknath Shinde)
(हेही वाचा : Sanjay Malhotra आरबीआयचे नवे गव्हर्नर; ११ डिसेंबरला स्विकारणार पदभार)
पुढे शिंदे(Eknath Shinde) म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कर्नाटकच्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक बोलावली होती. मात्र हे प्रकरण सर्वेाच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असल्याने कर्नाटक सरकारने ही मराठी भाषिकांवर अन्याय होऊ नये यासाठी लक्ष द्याला हवे. परंतु मराठी एकीकरण समितीचा मराठी भाषिकांचा मेळावा होऊ नये,यासाठी कर्नाटक सरकारने प्रयत्न करत दडपशाही केली, अशी टीकाही शिंदे यांनी केली. तरी कर्नाटक सरकारच्या या दडपशाहीचा शिंदेंनी निषेध आणि धिक्कार केलेला आहे. तसेच कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या पाठिशी उभे राहिलं, अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका असल्याचे ही शिंदे (DCM Eknath Shinde)म्हणाले. (DCM Eknath Shinde)
हेही पाहा :