शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख ईमेल द्वारे करण्यात आला आहे. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, लॉ अँड ऑर्डरचे सहआयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी या धमकीबाबत माहिती दिली. मला अनेकवेळा अशा धमक्या आलेल्या आहेत. पण मी असल्या धमक्यांचा कधी विचार केला नाही. मी माझे काम करत राहिलो आणि आताही काम सुरू राहणार आहे. (DCM Eknath Shinde)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी गुरुवार, 20 फेब्रुवारी दिल्ली येथे मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Delhi CM Rekha Gupta Oath Ceremony) यांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आजचा दिवस एनडीए (NDA) आणि दिल्लीसाठी ऐतिहासिक आहे. 27 वर्षांनंतर दिल्लीच्या तख्तावर एनडीए आणि मोदींचा भगवा झेंडा फडकला आहे. रेखा गुप्ता ही लाडकी बहीण मुख्यमंत्री झाल्या. त्यामुळे आता दिल्लीत होणारे प्रदूषण, वाहतूक कोंडी तसेच थांबलेल्या विकास असे प्रश्न मार्गी लावण्यासाठी चालना मिळेल. विकासाला चालना मिळेल. महाराष्ट्रात जस डबल इंजिन सरकार काम करत आहे, तसेच दिल्लीच्या विकासासाठीही मोदींच्या मार्गदर्शनाखाली रेखा गुप्ता (Rekha Gupta) चालना देतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
(हेही वाचा – माजी मंत्री Abdul Sattar यांचा अनुदान घोटाळा; राजकीय वर्तुळात खळबळ)
गोरेगाव पोलीस, जेजे मार्ग पोलीस आणि मंत्रालयाला धमकीचा ईमेल प्राप्त
गोरेगाव पोलीस ठाणे, जेजे मार्ग पोलीस ठाणे आणि मंत्रालयाला धमकीचा ईमेल (Threatening email) प्राप्त झाला आहे. त्यामुळे सुरक्षा एजन्सी सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ईमेलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी आहे. सध्या असा अंदाज लावला जात आहे की कोणीतरी खोडसाळपणा केला असावा. तथापि, पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे. हा ई-मेल उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित असल्याने पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. हा ईमेल कुठून आला आणि कोणी पाठवला याचा तपास पोलीस करत आहेत.
(हेही वाचा – तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री Udayanidhi यांचा उर्मटपणा; म्हणाले, मोदीजी…)
एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा शपथविधी सोहळा गुरुवार, 20 फेब्रुवारी रोजी पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीत पोहोचले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा परततील. त्यांना मिळालेल्या धमकीच्या ई-मेलमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त सादर होणार ‘माझी जन्मठेप’चा रंगमंचीय नाट्याविष्कार)
मुंबई पोलिस (Mumbai Police) सतर्क स्थितीत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना असा धमकीचा ईमेल येणे खूप धक्कादायक आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे आहे की पोलीस या अज्ञात व्यक्तीपर्यंत कसे पोहोचतात आणि यासाठी कोणती पावले उचलतात? तथापि, राज्यातील एका महत्त्वाच्या नेत्याला अशी जीवे मारण्याची धमकी मिळणे ही अतिशय गंभीर बाब आहे. उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे आता सुरक्षा व्यवस्था काय निर्णय घेते ते पहावे लागेल.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community