कोल्ड वॉरसंबंधी DCM Eknath Shinde यांनी केला खुलासा; म्हणाले, महायुतीमध्ये…

139

राज्यात सध्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असलेल्या महायुतीचे सरकार (Mahayuti Govt) आहे. पण या महायुतीच्या सरकारमध्ये कधीकधी नाराजीचा सूर पाहायला मिळतो. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुती संदर्भात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. (Eknath Shinde)

(हेही वाचा – Accident : मध्यप्रदेशातील भिंड येथे भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू; 21 जण जखमी)

महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी नवीन वॉर रूम सुरू केली, असे बोलले जात आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर मंत्रालयात अंडरवर्ल्ड सुरू आहे. राजकीय अराजकता निर्माण झाली, असा आरोप केला. या सर्व विषयांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीमध्ये कोणतेही कोल्ड वॉर (Cold War) सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर सुरू असल्याची टीका विरोधकांवर केली आहे. ते मंगळवार, १२ फेब्रुवारी रोजी मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वॉर रूमबाबत (War room) विचारले असता, राज्यातील महत्वाच्या पायाभूत सेवा प्रकल्पांचा आढावा घेणारी एकच वॉर रुम आहे. नवीन वॉर रुम उघडली नाही. शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्यांकडील खात्यांचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष वॉर रुमशी संलग्न आहे. त्यामुळे महायुतीत कोल्ड वॉर नाही तर महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर आहे, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Maharashtra Cabinet Decision: राज्य सरकार अमली पदार्थांच्या विरोधात कठोर पावले उचलणार; मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ निर्णय)

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला ‘हा’ सल्ला

एकनाथ शिंदे यांनी पक्षात सुरू असलेल्या इनकमिंगवरही प्रतिक्रिया दिली. शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. तुम लढो हम कपडा संभालता है या विचारांचा नाही. आज शिवसेनेत मोठ्या संख्येने लोक येत आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतोय. पण ज्यांना सोडून लोक जात आहेत, त्यांनी त्यावर आत्मपरीक्षण करायला हवे, असा खोचक सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिला.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.