पुण्यात एका अज्ञात व्यक्तीकडून थेट पंतप्रधानांना ईमेलद्वारे धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीवर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात व्यक्तीकडून ई मेल द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मी भारतामध्ये सिरीयस बॉम्बब्लास्ट करण्याचा प्लॅन करत आहे, मी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करेन, अशा आशयाचा मेल करत अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आला आहे. तसेच आय विल किल नरेंद्र मोदी असा उल्लेख करत मेल व्दारे धमकी देण्यात आली आहे. Mokheem1 [email protected] या मेल ID वरून धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. अधिक तपास अलंकार पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
(हेही वाचा Smriti Irani : ‘गांधी कुटुंबात हिंमत असेल तर…’; स्मृती इराणींचा विरोधकांवर जोरदार पलटवार)
Join Our WhatsApp Community