राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महेश आहेर यांना आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात पोलीस ठाण्यामध्ये जाऊन चोप दिला. महेश आहेर हे ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त असून आव्हाड कुटुंबीयांना संपवण्यासाठी त्यांनी तिहार जेलमधील गँगस्टर सुभाषसिंह ठाकूर ऊर्फ बाबाजीला सुपारी दिल्याची कबुली देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर पोलिसांनी आहेर यांना ताब्यात घेतले, मात्र आव्हाडांच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोलीस ठाण्याबाहेर चोप दिला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.
काय आहे व्हायरल क्लिपमध्ये?
या प्रकरणातील व्हारल ऑडिओ क्लिपमध्ये सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचे नाव आले आहे. ठाणे पालिकेतील प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संभाषणात महेश आहेर यांनी जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख साप असा केला असून त्यांना ठेचण्याची भाषाही आहेर यांनी केली आहे. या संभाषणात, माझे जेव्हा प्रोटेक्शन काढले. तेव्हा रात्री पावणे बारा वाजता सीएमनी जॉइन्ट सीपीना फोन केला होता. माझ्या जीवाला जितेंद्र आव्हाडांकडून धोका आहे, असे मी क्रिएट करून ठेवले आहे. पोलीस अधिकाऱ्यांना पटवून ठेवले आहे. आव्हाड माझे केव्हाही काही करू शकतो, असे मी क्रीएट करून ठेवले आहे. बाबाजीला सांगून आमचे शूटर स्पेनमध्ये कामाला लावले आहेत. नातशाचा पत्ता शोधला आहे. त्याचा जावई ठाण्यात नाही आला. तर त्याच्या बापावर एक अटॅक केला ना, तर तो एका दिवसात येईल. मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावली. तो असा नाही आला ना त्याच्या एरियाचा पत्ता शोधून ठेवला आहे स्पेन एवढे मोठे नाही. त्याचा विकास कॉम्प्लेक्स पत्ता आहे. त्याच्या आई-वडिलांच्या सोबत एक कांड केला. तर तो आई-बाबांच्या ओढीने लगेच येईल. मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावली. त्याची गेम करणार त्याच्या मुलीला रडायला लावणार, म्हणजे त्याला कळणार मुलीच दुःख काय असते? प्लानिंग केले आहे. तो साप आहे, असे संभाषण या क्लिपमध्ये आहे.
(हेही वाचा Shiv jayanti 2023: योगी सरकारच्या काळात शिवजयंतीच्या यात्रेत पोलिसांचा खोडा)
Join Our WhatsApp Community