…म्हणून ‘त्याने’ दिली पवारांना धमकी! अन् पोलिसांनी बिहारमधून घेतले ताब्यात

122

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी मंगळवारी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा व्यक्तीचा शोध सुरू केला होता आणि आज, बुधवारी धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे.

(हेही वाचा – सुषमा अंधारेंची तत्काळ पक्षातून हकालपट्टी करा; वारक-यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी)

… म्हणून त्याने दिली पवारांना धमकी

धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव नारायण कुमार सोनी असून या आरोपी व्यक्तीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीला घेऊन पोलीस महाराष्ट्राकडे रवाना होत आहेत. दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करणाऱ्या पत्नीवर कारवाई न झाल्याने शरद पवार यांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वय वर्ष ४५ असणाऱ्या नारायण कुमार सोनी याला मुंबई पोलिसांच्या पथकाने बिहारमधील पटणा येथून अटक केली आहे. शरद पवारांना देण्यात आलेल्या धमकीचा फोन हा बिहारमधून आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने ही धमकी हिंदीतून दिली असून पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांत अज्ञाताविरोधात भादंवि कलम 294, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकीच्या फोननंतर मुंबई पोलिसांकडून या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली आणि या धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतले.

अशी दिली धमकी

आरोपीने शरद पवारांना धमकी देताना हिंदी भाषेतून ही धमकी दिली. यावेळी त्याने अपशब्द वापरले. मुंबई में आके देसी कट्टे से उडा दूंगा… असे म्हटले होते. शरद पवारांना धमकीचा फोन कॉल बिहारमधून आला असून यापूर्वीही त्याच व्यक्तीने पवारांना धमकी दिली होती. त्यावेळी मात्र त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली होती आणि समजूत घालून सोडून दिले होते. परंतु त्याने पुन्हा एकदा धमकी दिली. फोन करणाऱ्या या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसून तो व्यक्ती मनोरूग्ण असल्याचीही माहिती मिळतेय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.