ज्ञानवापीनंतर आता उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशीद-हरिहर मंदिर वादात हिंदूंचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. स्वत:ला निधी झा असे लिहिणाऱ्या @nidhijhabuhar या सोशल मीडिया हँडलने वकील विष्णू शंकर जैन (Vishnu Shankar Jain) यांचे छायाचित्र पोस्ट केले आणि लिहिले, ‘मुस्लिमांनो, त्याचा चेहरा नीट ओळखा….” ॲडव्होकेट जैन यांनी संभल जिल्ह्यातील सायबर पोलिस ठाण्यात या हँडलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संभलचे एसपी कृष्ण कुमार विश्नोई यांनी सांगितले की, X हँडलविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर गुन्हे पथक त्याचा तपास करत आहे. ते म्हणाले की, सध्या हे खाते कोण आणि कुठून चालवले जात आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वातावरण बिघडवणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असेही ते म्हणाले. (Vishnu Shankar Jain)
Join Our WhatsApp Community