सध्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) जी सुनावणी सुरु आहे, तिला सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे. आता सोमवार, १८ डिसेंबरपासून यावर सुनावणी सुरु होणार असून १० जानेवारी रोजी यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
दीड वर्षांपासून सुरु होता वाद
विधानसभा अध्यक्षांसमोर तीन दिवस ही सुनावणी सुरू असणार आहे. यातील प्रत्येकी दीड-दीड दिवस शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवाद करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्यास मुभा दिली आहे. याआधी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. साधारणतः दीड वर्षांहून जास्त काळ महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात गटात सुरू असलेला आमदार अपात्रतेचा वाद (MLA Disqualification Case) आगामी वर्षाच्या सुरुवातीला निकाली निघणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. शिवसेना दोन्ही गटाची उलट तपासणी झाल्यानंतर आणि लेखी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम सुनावणी सुरू होणार आहे.
(हेही वाचा Maratha Reservation : भुजबळ आणि जरांगे पाटलांमध्ये वाकयुद्ध सुरूच; बेवड्या, माकड, टकुऱ्या आणि बरेच काही)
Join Our WhatsApp Community