एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावे, हा माझा प्रस्ताव होता. त्याला आमच्या वरिष्ठ नेत्यांनी मान्यता दिली. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री होणे, हा माझ्यासाठी धक्का नव्हता. पण मी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी, हा निर्णय माझ्यासाठी धक्का होता, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.
( हेही वाचा : catholic priest committing sexual assault : चर्चेसमधील वासनांध पाद्र्यांचे कारनामे!)
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, सत्तांतर घडत असताना सर्व घडामोडी क्रिकेटच्या टी-२० सामन्याप्रमाणे घडत गेल्या. त्यामध्ये कधी काय निकाल लागेल, याचा अंदाज नव्हता. परिस्थितीनुसार गोष्टी बदलत होत्या. पण एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय माझ्या सहमतीने झाला. यापुढे जाऊन मी असे म्हणेन की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याला मान्यता दिली. त्यामुळे त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री होणे, हा माझ्यासाठी धक्का नव्हता.
पण, मी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी, हा निर्णय माझ्यासाठी धक्का होता. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जेव्हा माझ्याशी चर्चा केली, तेव्हा ते या निर्णयावर ठाम होते. त्यांनी ज्याप्रकारे मला समजावून सांगितले, त्यामध्ये पपक्षाचे हित होते. जेव्हा मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होतो, तेव्हा माझ्या मनात विविध प्रकारचे विचार सुरू होते. ते चेहऱ्यावरही स्पष्टपणे दिसत होते, ही बाब मी लपवणार नाही. पण या निर्णयानंतर महाराष्ट्र आणि देशातून मला प्रचंड पाठिंबा मिळाला, असेही फडणवीस यांनी सांगितले.
‘त्या’ निर्णयांबाबत आता समाधानी
मुख्यमंत्री बनून माझे कर्तृत्व जेवढे वाढले असते, तेवढेच उपमुख्यमंत्री बनून वाढले. आम्ही जे परिवर्तन केले, ते महाराष्ट्र आणि देशाच्या हिताचे आहे, हे लोकांना समजले आहे. जेव्हा तुम्ही असे परिवर्तन करत असता, तेव्हा तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात. तेव्हा घेतलेल्या निर्णयावर आता पूर्णपणे समाधानी आहे, असेही फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community