भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी झाल्यानंतर घटक पक्ष म्हणून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी (२२ डिसेंबर) दिली. (Sunil Tatkare)
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय मेळावा येत्या ७ जानेवारीला षण्मुखानंद सभागृहात आणि त्यानंतर १२ जानेवारीला प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहितीही तटकरे यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर शुक्रवारी महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर विचारमंथन आणि पक्षाची भविष्यातील वाटचाल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. पक्षातील विविध पदांच्या नियुक्त्या, बुथ कमिट्या नियुक्ती, याशिवाय जिल्ह्याची देण्यात आलेली जबाबदारी याबाबतची माहिती अजित पवार यांनी घेतली. तसेच आगामी काळात महिला, विद्यार्थी, युवतींसाठीही मेळावे घेणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. (Sunil Tatkare)
(हेही वाचा – Mahalakshmi Saras Exhibition : मुंबईत २६ डिसेंबरपासून ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन; गिरीश महाजन यांची माहिती)
दरम्यान, काही प्रसिद्धीसाठी हपापलेले व्यक्ती स्वतः च्या महत्वाकांक्षेसाठी पक्षाच्या भूमिकेबद्दल वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. येणाऱ्या काळात एनडीएचा (NDA) घटक पक्ष म्हणून महायुतीच्या सोबत निवडणूक लढवत असताना निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने लागेल या अपेक्षेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पक्षाच्या चिन्हावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. हा निर्णय आमचा पूर्वीच ठरला आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. (Sunil Tatkare)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community