गायीचे संरक्षण हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. हे भारतीय नागरिकांचे धार्मिक कर्तव्य आहे, म्हणूनच या संस्कृतीचे रक्षण हे धर्माच्या पलीकडे जाऊन करण्याची गरज आहे, तरच देशाचे कल्याण होईल, त्यासाठी केंद्र सरकारने गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावे, असे मत अलाहाबादच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने व्यक्त केले.
…म्हणून देश कमकुवत केला जातो!
गोहत्याबंदी कायदा असून आरोपी जावेद याने गोहत्या केली. या प्रकरणी अटकेत असलेल्या जावेदने जामिनासाठी अर्ज केला, मात्र न्यायालयाने त्याला जामीन नाकारला. या परिस्थितीत अर्जदाराने सकृद्दर्शनी गुन्हा केल्याचे स्पष्ट होत आहे. आरोपीने यापूर्वीही अशीच कृत्ये केली असून यात जामीन मंजूर केला तर त्यामुळे समाजातील सुसंवाद ढासळेल, असे न्यायालयाने म्हटले. भारत हा एकमेव असा देश आहे, ज्या ठिकाणी सर्व धर्माचे नागरिक राहतात, उपासना करतात. देशाची हि एकजूट टिकवण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करतात, मात्र काही जण असेही असतात ज्यांना याविषयी काहीही स्वारस्य नसते ते मात्र देश कमकुवत करतात, असेही न्यायालयाने म्हटले.
गोशाळा फक्त पैसे लुबाडण्यासाठीच!
सरकार गोशाळा बांधते, पण ज्या लोकांनी गायींची काळजी घ्यायची तेच काळजी घेत नाहीत. त्याचप्रमाणे काही खासगी गोशाळा या केवळ नावापुरत्या असून त्या केवळ लोकांकडून देणग्या गोळा करतात व गोरक्षण केल्याचा देखावा निर्माण करून सरकारकडूनही पैसा लुबाडतात. ती मदत त्यांच्या स्वत:च्या हितासाठी खर्च केली जाते, गायींची काळजी घेण्यासाठी पैसे वापरले जात नाहीत. गायीचे संरक्षण हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. हे भारतीय नागरिकांचे धार्मिक कर्तव्य आहे, म्हणूनच या संस्कृतीचे रक्षण हे धर्माच्या पलीकडे जाऊन करण्याची गरज आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community