निसर्ग चक्रीवादळानंतर सावरण्याचा प्रयत्न सुरू केलेल्या कोकणवासीयांना वर्षभराच्या आत पुन्हा एकदा तौक्ते चक्रीवादळाचा सामना करावा लागला. या चक्रीवादळाने राज्याला, विशेषतः कोकणाला चांगलाच दणका दिला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील सर्वच तालुके या चक्रीवादळाने प्रभावित झाले असून घर, गोठे, शाळा, शासकीय इमारती, फळबागा, उन्हाळी पिके, मच्छिमार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पशुधन व जीवितहानी देखील झाली आहे. कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाच्या कटू आठवणी विसरण्याचा आणि पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोकणवासीयांना चक्रीवादळाने पुन्हा रडवले आहे. याच पार्श्वभूमीवर लगेच दुसऱ्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी तीन दिवसीय कोकण दौऱ्याला बुधवारी सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करुन, नुकसानाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
📍Visited the villages Khanav, Usar and Vave in Raigad district and understood from the people, the damages caused due to #CycloneTaukte.
खानाव, उसर आणि वावे या ठिकाणी वादळामुळे झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली.#तौक्ते pic.twitter.com/Xp2R4TyxF0— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2021
एसडीआरएफ मधून तातडीने नुकसानभरपाईची घोषणा करा
महाराष्ट्राचा विचार केला तर सुदैवाने नुकसान झालेले क्षेत्र कमी आहे, पण ज्या भागात झाले आहे त्या नुकसानाचा आवाका मोठा आह. त्यामुळे शासनाने निसर्ग चक्रीवादळात दिलेल्या तुटपुंज्या मदतीप्रमाणे मदत न देता, तातडीने पंचनामे पूर्ण करुन, भरीव नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर करावे. केंद्र सरकार एसडीआरएफला निधी देतच असते, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे केली आहे. त्यांनी रायगड जिल्हाधिकारी यांची भेट घेतली, त्यांच्याकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी खानाव उसर आणि वावे येथील नुकसानग्रस्त भागाची, अलिबाग येथील कोळीवाड्यातील नुकसानग्रस्त घरांची तसेच बोटींच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली.
📍Vave village, Raigad.
Houses have collapsed too. So, a problem regarding shelter too has arisen here due to #CycloneTaukte.
वावे येथे घर कोसळले आहे. त्यामुळे लोकांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी नागरिकांच्या भेट घेऊन त्यांच्याशीही संवाद साधला. pic.twitter.com/03aiwt7rvF— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2021
(हेही वाचाः तौक्ते चक्रीवादळाने राज्यात पाडले साडेपाच हजार विजेचे खांब)
कोळीबांधवांकडून फडणवीसांना साकडं
तौक्ते चक्रीवादळामुळे कोळीबांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोळीबांधवांनी आज फडणवीस यांच्यासमोर आपल्या अडचणींचा पाढा वाचला. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी झालेल्या नुकसानीचे पैसे अजूनही मिळाले नाहीत. आता पुन्हा आम्हाला नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे तत्काळ झालेल्या नुकसानीएव्हढी भरपाई सरकारकडून मिळवून द्या, अशी मागणी कोळीबांधवांनी या पाहणी दौऱ्यात केली. सरकारला भरघोस मदत देण्याला भाग पाडू, असा दिलासा यावेळी फडणवीस यांनी कोळीबांधवांना दिला.
अलिबाग बंदर येथे भेट देऊन मासेमार बांधवांशी संवाद साधला.
बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शासनाच्या वतीने तातडीने आणि भरघोस मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.#CycloneTauktae #तौक्ते pic.twitter.com/cgzJEuvwl2— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2021
१७२ गावांमध्ये वीजपुरवठा नाही
चक्रीवादळाच्या रौद्ररुपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळले असून, वीजपुरवठा खंडित झाला आहे. रायगड मधील १७२ गावे अजूनही अंधारात आहेत. त्यामुळे अनेक गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेऊन शासनाने विशेष मनुष्यबळ उपलब्ध करुन युद्धपातळीवर वीज जोडणीचे काम करावे, अशी मागणीही फडणवीस यांनी या दौऱ्यात केली आहे.
📍Medha,Roha taluka
This is how Primary health centre here got badly affected.
मेढा(रोहा तालुका)येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे असे नुकसान झाले आहे.
कोरोनाच्या काळात आरोग्य सेवांमध्ये खंड पडणे अजीबात परवडणारे नाही.त्यामुळे या केंद्राच्या फेरउभारणीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. pic.twitter.com/Fe6NTVw7Nc— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2021
(हेही वाचाः मोंदीच्या गुजरात भेटीवरुन महाराष्ट्रात राजकीय ‘वादळा’ला जोर! संजय राऊत म्हणाले…)
Join Our WhatsApp Community