महापौरांच्या प्रभागातील विकासकामांचे लोकार्पण! 

पर्यावरण आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. 

 

पर्यावरण आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १९९ च्या स्थानिक नगरसेविका तथा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रभागातील विविध विकासकामांचे लोकार्पण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली खासदार अरविंद सावंत यांच्या हस्तेकरण्यात आले. यावेळी माजी मंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे उपस्थित होते. करीरोड नाका येथील शिंगटे मास्तर चौकातील थर रचलेल्या गोविंदा शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर ना.म.जोशी मार्गावरील केदारी बाळकृष्ण रेडकर चौकाचे सुशोभिकरण करून बसविण्यात आलेल्या मलखांब शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर सुशोभिकरण करण्यात आलेल्या रमेश भाई सावंत सर चौकातील अभ्यास शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर कस्तुरबा रुग्णालयाजवळ सुशोभिकरण करण्यात आलेल्या मास्टर जग्गी पुगांवकर चौकातील संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले. सात रस्ता बाजार गल्ली येथे बसविण्यात आलेल्या व्यायाम साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर धोबीघाट येथील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या ६५ शौचालयाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर डिलाईल रोड रोड ना.म.जोशी मार्गावरील शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या बालवाडीचे लोकार्पण करण्यात आले.

(हेही वाचा : जून महिन्यातच पवई तलाव भरला!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here